बातम्या
भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही अशोक चव्हाणाचं मोठं वक्तव्य
By nisha patil - 12/2/2024 6:05:59 PM
Share This News:
मुंबई ; काँग्रेस नेते माजी आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा देखील राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा येत्या 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा मोठा जंगी कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांचा भलामोठा गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबतच्या चर्चा कितपत खऱ्या आहेत ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत भूमिका मांडली. ते विधान भवन परिसरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कुणाहीबद्दल वैयक्तिगत भावना नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
“मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप ठरवलेलं नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका काय असेल ते ठरवेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही”, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही अशोक चव्हाणाचं मोठं वक्तव्य
|