बातम्या
बिग बॉस 15 फेम शमिता शेट्टीचा ग्लॅम लूक चर्चेत
By nisha patil - 7/11/2023 9:16:11 PM
Share This News:
शमिताला बिग बॉस 15 मुळे विशेष लोकप्रियता मिळाली.शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले.शमिता ही कोट्यवधींची मालकीण आहे. ती 35 कोटी एवढ्या संपत्तीची मालकीण आहे.शमितानं 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बते' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.त्यानंतर तिनं फरेब, जहर, कॅश या चित्रपटांमध्ये काम केले. झलक दिखला जा आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9' या कार्यक्रमांमध्ये देखील तिनं सहभाग घेतला.बिग बॉसच्या तिसऱ्या आणि 15 व्या सिझनमध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता. 'यो के हुआ ब्रो' या सीरिजमध्ये शमितानं काम केलं.शमिता ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. ती सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.शमिताने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या रंगाच्या शरारा मध्ये दिसत आहे.
बिग बॉस 15 फेम शमिता शेट्टीचा ग्लॅम लूक चर्चेत
|