बातम्या

बिग बॉस फेम राकेश बापट रुग्णालयात दाखल

Bigg Boss fame Rakesh Bapat admitted to hospital


By nisha patil - 2/8/2023 8:32:25 PM
Share This News:



बिग बॉस ओटीटी फेम अभिनेता राकेश बापट  हा सध्या त्याच्या हेल्थमुळे चर्चेत आहे.  राकेशनं नुकताच हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चाहत्यांना माहिती दिली की, तो रुग्णालयात दाखल झाला आहे. राकेशला का रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबाबत त्यानं कोणतीही माहिती अजून चाहत्यांना दिलेली नाही.

राकेशनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाताला ड्रिप लावलेली दिसत आहे. मात्र, या फोटोत राकेशचा चेहरा दिसत नाही. त्याने हा फोटो इव्हिल आय आणि थर्मामीटरच्या इमोजीसह  शेअर केला आहे.राकेश  हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बिग बॉस ओटीटी या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीसोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा झाली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतरही अनेकवेळा दोघेही एकत्र दिसले. मात्र, शमिता आणि राकेश यांचा नंतर ब्रेकअप झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली.राकेश हा को तू आशिकी, बिग बॉस 15, बात हमारी पक्की है, कुबूल है, नच बलिए 6 यांसारख्या शोमध्ये दिसली. त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. वो तुम बिन, दिल विल प्यार व्यार, कुछ दिल ने कहा, कोई मेरे दिल में है, गिप्पी, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. राकेशला टीव्ही शोमधून जास्त लोकप्रियता मिळाली. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील  अस्सी नब्बे पूर सौ या वेब शोमध्ये देखील काम केले आहे.


बिग बॉस फेम राकेश बापट रुग्णालयात दाखल