बातम्या
कोल्हापूरात अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको...
By nisha patil - 8/12/2023 3:29:37 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील 3,493 सेविका व 3,533 मदतनीस म्हणजे एकूण 7,349 अंगणवाडी कर्मचारी 100% संपात सहभागी झालेले आहेत.
अंगणवाडीसेविकांनी चार तारखेला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिलेले होते.त्यानंतर त्यांना मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून चर्चेचे निमंत्रण आले.मुंबईत मंत्रालयात या संदर्भातली बैठक पार पडली. परंतु सरकारने मागणी मान्य न केल्यामुळे वाटाघाटी फिस्कटल्या. 45 दिवसांपूर्वीच सेविकांनी सरकारला संपाची नोटीस दिलेली होती. सेविकेच्यावर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अधिवेशनावर प्रचंड मोर्चाने जाण्याचे ठरवण्यात आले.
या मुख्य मागण्या यावेळेस करण्यात आल्या. यावेळेस सतीशचंद्र कांबळे, शुभांगी पाटील, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर,आदी प्रमुख कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होते.
कोल्हापूरात अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको...
|