बातम्या

केजरीवालांच्या समर्थनार्थ आप तर्फे रक्तदान

Blood donation by AAP in support of Kejriwal


By nisha patil - 3/28/2024 8:00:54 PM
Share This News:



दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली होती. केजरीवालांना समर्थ देण्यासाठी आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बिंदू चौक येथील रक्तदान शिबिरात बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला.

केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. आप ने आज राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून केजरीवालांच्या कार्याला मानणाऱ्या नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहान केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. केजरीवालांची अटक चुकीची असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याचे उत्तर मतदार दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.

कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीश्चंद्र कांबळे, दिलीप पवार, रमेश मोरे यांनी शिबीरस्थळी भेट दिली.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, समीर लतीफ, दिग्विजय चिले, वैजनाथ शिंत्रे, राकेश गायकवाड, संजय नलवडे,  डॉ. कुमाजी पाटील, ऍड. चंद्रकांत पाटील, राजेश खांडके, रमेश कोळी, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी, आनंदा चौगुले, चेतन चौगुले, शकील मोमीन, संजय राऊत, रणजित बुचडे, कुमार साठे आदी उपस्थित होते.


केजरीवालांच्या समर्थनार्थ आप तर्फे रक्तदान