बातम्या

शिवसेनेच्या वर्धापन दिनी शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे

Blood donation camps in various places in the city on the anniversary of Shiv Sena


By nisha patil - 6/18/2024 8:59:14 PM
Share This News:



कोल्हापूर दि.१८ : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न संपणारी आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून तंतोतंत जपला जात आहे. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह रुग्णांना फळेवाटप, बालसंकुलास मदत अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवार दि.१९ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत शहरात शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ, महाराणी ताराराणी हॉल मंगळवार पेठ, श्री वेताळ तालीम शिवाजी पेठ, उत्तरेश्वर वाघाची तालीम उत्तरेश्वर पेठ, राधाकृष्ण तरुण मंडळ शाहूपुरी, तटाकडील तालीम शिवाजी पेठ या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.


शिवसेनेच्या वर्धापन दिनी शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे