विशेष बातम्या

पालखीसाठी देहूनगरी सज्ज

Body ready for palanquin


By nisha patil - 10/6/2023 5:15:01 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला   ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार आहे. देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.  यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.


पालखीसाठी देहूनगरी सज्ज