बातम्या
सांगलीत एकाच मतदान केंद्रावर चार महिलांच्या नावे बोगस मतदान
By nisha patil - 9/5/2024 7:20:00 PM
Share This News:
सांगली लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात घट झाली आहे. सांगली लोकसभेसाठी 58 टक्के मतदानाची नोंद झाली. 2019 मध्ये 55.78 टक्के मतदान झाले होते. उन्हाचाही परिणाम मतांवर झाल्याचे दिसून आलं आहे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 2,448 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यावेळी सांगलीत लोकसभा मतदानावेळी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मतदानादिवशी सांगली शहरातील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची तक्रार निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला.
सांगलीत एकाच मतदान केंद्रावर चार महिलांच्या नावे बोगस मतदान
|