बातम्या

चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला आनंद

Bollywood actors express happiness after the successful landing of Chandrayaan3


By nisha patil - 8/24/2023 10:01:27 PM
Share This News:



भारताचं चांद्रयान ३ काल चंद्रावर उतरलं. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  उतरणारा पहिला देश ठरला आहे. देशभरातील लोकांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं सेलिब्रेशन केलं. तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेता शाहरुख खाननं  एक खास ट्वीट शेअर करुन इस्रोचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,  'चांद तारे तोड़ लाऊं....सारी दुनिया पर मैं छाऊं, आज भारत और इस्रो छा गया, सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. चांद्रयान-3 यशस्वी झाले आहे. चांद्रयान-3 चे चंद्रावर साँफ्ट-लँडिंग झाले.'अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'चांद्रयान 3 च्या लँडिंगच्या उल्लेखनीय यशाबद्दल isro चे अभिनंदन. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण. जय हिंद!'तसेच अक्षय कुमारनं देखील ट्वीट शेअर करुन isro चे आभार मानले आहेत.  त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'आज अनेकजण isro ला थँक्यु म्हणत आहेत.'विक्की कौशल,श्रद्धा कपूर, प्रकाश राज या सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर चांद्रयान-3 बाबत पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.

14 जुलै रोजी पृथ्वीवरून निघालेलं चांद्रयान-3 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलं.  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पानं जोडलं गेलं आहे.


चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला आनंद