विशेष बातम्या

आयपीएल फायनल मॅच पाहून भारावले बॉलिवूड कलाकार

Bollywood actors were overwhelmed by watching the IPL final match


By nisha patil - 5/30/2023 4:33:13 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम सोशल मीडियावर सीएसके आणि गुजरात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा पराभव करुन आयपीएलच्या  ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद या टीमच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्सला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंह , कार्तिक आर्यन , अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री अथिया शेट्टी  यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 
रणवीर सिंहनं ट्वीट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्स या संघाचं कौतुक केलं आहे. रणवीरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'रविंद्र सिंह जाडेजा, ओह माय गॉड. व्हाट अ फिनिश व्हाट!!! अ फाइनल!!!'रणवीरनं गुजरात टायटन्स या टीमसाठी देखील एक खास ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'हार्दिकचे उत्तम नेतृत्व द फाइट अँड माइट ऑफ थिस टीम'


आयपीएल फायनल मॅच पाहून भारावले बॉलिवूड कलाकार