विशेष बातम्या
बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणारा अटकेत
By nisha patil - 6/30/2023 1:01:22 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : ईदच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोटाचा निनावी फोन करणाऱयाला मालवणी पोलिसांनी अटक केली. नासिमुल हसन शेख असे त्याचे नाव आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ईद आणि आषाढी एकादशी असल्याने शहरात अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली. आज सकाळच्या सुमारास पालिकेच्या नियंत्रण कक्षात फोन आला. आज मुंबई शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगण्यात आले. पालिकेने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने याची माहिती मालवणी पोलिसांना दिली.
त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. धमकीच्या फोनप्रकरणी मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना नासिमुलची माहिती मिळाली. तो मालवणीच्या आझमी नगर येथे असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी नासिमुलला ताब्यात घेऊन अटक केली. समाजातील वर्गामध्ये शत्रुत्वाची द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि पोलिसांकडून सुरक्षात्मक उपाय योजनाचा त्रास व्हावा यासाठी त्याने फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणारा अटकेत
|