बातम्या

कोल्हापुरात पाण्यासाठी बोंबाबोंब

Bombs for water in Kolhapur


By nisha patil - 6/11/2023 1:32:09 PM
Share This News:



दिवाळीचा सण तोंडावर जवळ आला असून खरेदीसाठी लगबग सुरू असतानाच घरात पाण्याचा ठणठनाट निर्माण झाल्याने महिलांची धावपळ उडत आहे दिवसभर पाण्याच्या टँकरसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे त्यानंतर टँकर आला की टँकरभोवती महिला मुले आणि नागरिकही गराडा घालून येत असल्याचे दिसत आहे

 कोल्हापूर : भोगावती नदीतून बालिंगा उपसा केंद्राकडे रॉ वॉटर घेऊन जाणाऱ्या दगडी चॅनलची पडझड झाल्याने महापालिकेकडून हे चॅनेल दुरुस्तीचे काम सुरू आहेत परिणामी शहरात पाण्याचा ठणठणात निर्माण झाला असून दिवाळी सणाच्या तोंडावर पाण्यासाठी बोंबाबोंब करण्याची वेळ सर्व नागरिकांच्या वर आली आहे महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे टँकरवर पाणी भरण्यासाठी महिला मुले आणि नागरिकांची झुंबड उडत आहे टँकरच्या सहाव्यातून पाणीपुरवठा सुरू असतानाच नागरिक टँकरवर चढून पाहण्यासाठी घागरी भरून घेत आहेत पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरवर पाणी भरण्यासाठी भाऊसिंगजी रोडवर झुंबड उडाली कोल्हापूर शहराला पंचगंगा नदी असताना देखील पाणी घरोघरी मिळत नाहीये एखाद्या दुष्काळी भागात पाणी भरण्यासाठी टँकरवर जे चित्र दिसते ते चित्र कोल्हापूर सारख्या पाण्याने समृद्ध असणाऱ्या शहरात दिसत आहे


कोल्हापुरात पाण्यासाठी बोंबाबोंब