बातम्या

विवेकानंद  कॉलेजमध्ये ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' उपक्रमांतर्गत  ग्रंथ  प्रदर्शन

Book exhibition under Vachan Sankalp Maharashtrach


By nisha patil - 1/13/2025 3:34:12 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' उपक्रमांतर्गत  ग्रंथ  प्रदर्शन

कोल्हापूर दि. 12 :  स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत  विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन संपन्न झाले.  या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन श्री  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले. 

       ग्रंथ प्रदर्शनात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जीवनावरील ग्रंथ ,भारतीय संगीत व कला तसेच दुर्मिळ ग्रंथ ठेवण्यात आले. होते . याप्रसंगी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करण्याचा संदेश कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी दिला. कार्यक्रमास संस्थेच्या सचिवा मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर .कुंभार ,मा. श्री सुनील कुलकर्णी, प्रबंधक आर. बी . जोग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी स्वागत केले. सहाय्यक ग्रंथपाल श्री हितेंद्र साळुंखे यांनी आभार मानले. ग्रंथालयातील सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.


विवेकानंद  कॉलेजमध्ये ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' उपक्रमांतर्गत  ग्रंथ  प्रदर्शन
Total Views: 41