बातम्या
विवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म व गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
By nisha patil - 5/17/2024 11:53:14 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या ग्रंथालयास गबुला फाऊंडेशन, मुंबई व विस्ड्म फाऊंडेशन, वाठार यांचेकडून रुपये दोन लाखाहून पेक्षा जास्त् रक्कमेचे 206 ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. सदरचे ग्रंथ विस्ड्म फाऊंडेशन, वाठारचे मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. अजय मस्के यांनी कॉलेजकडे सुपुर्द केली. याप्रसंगी गणित विभाग प्रमुख प्रा. एस. पी. थोरात, डॉ. बापूजी इंजिनिअरींग इन्स्टीटयूटचे प्राचार्य डॉ.विरेन भिर्डी, कॉलेजचे प्रबंधक श्री. आर. बी. जोग, प्रा.डॉ. संजय लठ्ठे, प्रा सतीश चव्हाण, ग्रंथालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता. ग्रंथालयास भेट दिल्याबद्दल ग्रंथपाल डॉ.नीता पाटील यांनी आभार व्यक्त केले.
विवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म व गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
|