बातम्या

बोरपाडळे ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहिर

Borpadle Gram Panchayat Election Reservation Announced


By nisha patil - 12/2/2024 12:36:48 PM
Share This News:



बोरपाडळे : प्रतीनिधी  बोरपाडळेे (ता.पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत निवडणूक सण २०२४ साठी आरक्षण जाहीर झाले आहे .
 

थेट सरपंच पदासाठी अनुसूचित जाती प्रवार्गासाठी या आगोदरच आरक्षित झाले असून सरपंचपद वगळता चार प्रभागातील एकूण ११ सदस्य जागासाठी लॉट (चिठ्या टाकून) पद्धतीने निश्चित करण्यात आले आहे.
 

ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थ व लोक प्रतिनिधी यांच्या समक्ष जाहिर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे:  प्रभाग क्र. एक मध्ये सदस्य सख्या ३, पैकी  सर्वसाधरण स्त्री संख्या १, सर्वसाधरण पुरुष संख्या,२, प्रभाग क्र. दोन मध्ये सदस्य संख्या २, पैकी  सर्वसाधरण स्त्री संख्या १, सर्वसाधरण पुरुष संख्या १ प्रभाग क्र तीन मध्ये सदस्य संख्या ३, पैकी  अनुसूचित जाती स्त्री संख्या १, सर्वसाधरण स्त्री संख्या १, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष संख्या १. प्रभाग क्र चार मध्ये सदस्य संख्या ३ पैकी  नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री संख्या १, सर्वसाधरण स्त्री संख्या १, सर्वसाधरण पुरुष संख्या १
आरक्षण प्राधिकृत अधिकारी मंडलअधिकारी जेरॉन गोन्सालवीस ,तलाठी चंद्रकुमार घोडे-पाटील , ग्रामसेविका विद्या पाटील, कोतवाल अशोक भाकरे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही आरक्षण प्रक्रिया पार पडली 

 

यावेळी सरपंच शरद जाधव,सर्व ग्रा.पं.सदस्य, कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते बोरपाडळे ग्रामपंचायत प्रभाग रचनेसह निवडणूक आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार,आणि नेते मंडळी सह ग्रामस्थांमध्ये निवणुकीचे वातावरण तापू लागले आहे इच्छुक उमेदवार आपला सुरक्षित प्रभागाच्या शोधत असून त्यांनुसार चाचपणी सुरू झाली आहे


बोरपाडळे ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहिर
Total Views: 2