बातम्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Both actress Shilpa Shetty and her businessman husband Raj Kundra are likely to get into trouble


By nisha patil - 6/14/2024 8:08:38 PM
Share This News:



अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.  
 

मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले की, शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.त्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स यांना सराफा व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांच्या तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याशिवाय, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर तपासानंतर आरोप खरे सिद्ध झाले तर पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या सर्व आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा असेही कोर्टाने निर्देश देताना म्हटले आहे. दरम्यान, राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. तर, अॅडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत. राज कुंद्रा सध्या जामिनावर आहे.


अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता