बातम्या

सीपीआर रुग्णालयात नोकरी लावण्याचा आमिषाने दोघांची फसवणूक

Both cheated with the lure of getting a job in a CPR hospital


By nisha patil - 8/2/2025 2:14:49 PM
Share This News:



सीपीआर रुग्णालयात नोकरी लावण्याचा आमिषाने दोघांची फसवणूक 

राधानगरी तालुक्यातील नितीन कांबळे आणि गणेश कांबळे या दोघांनी गायत्री जयवंत वारके आणि दिलीप गणपती दावणे यांना सीपीआर रुग्णालयामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांच्या कडुन वेळोवेळी पैसे घेतले.त्यांची फसवणूक करण्याच्या हेतूनं आयुक्त मा.जिल्हा विभाग रुग्णालय ,कोल्हापूर.यांना शिफारस केल्याचे खोटं नियुक्तपत्र तयार केलं.

त्यावर सीपीआरचे आधिष्ठाता मा.डॉ.एस.एस.मोरे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिरी अमोल येडगे यांच्या बनावट सही आणि शिक्का मारून हे नियुक्तीपत्र दिलं. याप्रकरणी सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.दिलेल्या फिर्यादी नुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

त्यानुसार पोलिसांनी तात्काळ नितीन कांबळे आणि गणेश कांबळे या दोघांना अटक केली.पोलिसांनी शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकरसो,पोसई खंडेराव गायकवाड ,पोलिस गजानन परीट ,प्रितम मिठारी,मंगेश माने आणि किशोर पवार यांनी केली.


सीपीआर रुग्णालयात नोकरी लावण्याचा आमिषाने दोघांची फसवणूक
Total Views: 54