बातम्या
शिरोली येथे पोलीस पाटील घराण्याच्या वतीने सीमोल्लंघन संपन्न
By nisha patil - 10/14/2024 9:49:24 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) पुलाची शिरोली येथील दसरा मैदानाच्या पटांगणात शनिवारी संस्थानकालीन स्मृती जागवणारा पारंपारीक सिमोल्लंघन व दसरा सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा झाला. सूर्यास्ताच्या साक्षीने आपट्याच्या पानावर गावकामगार पोलीस पाटील घराण्याचे मानकरी राजेश पाटील यांनी तलवार मारून सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
बिरदेव व म्हसोबा देवाच्या पालख्यांची गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल वाजवत, भंडारा उधळत व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली. सोने लुटल्यानंतर बिरदेव मंदीराच्या प्रवेश द्वारावर बकऱ्याला तलवार मारून बळी देण्यात आला. त्या नंतर एकमेकांना आपट्याचे पान देत, सोनं घ्या, सोन्यासारखे रहा, अशा शुभेच्छा दिल्या. घट बसविणे, उठविणे, जागर, दुर्गामाता दौड, महाआरती, दुर्गामाता मुर्ती प्रतिष्ठापना आदी कार्यक्रमही मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व गावातील हिंदुत्ववादी तरुणांनी मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौडचे आयोजन केले होते.या सोहळ्या प्रसंगी पोलीस निरीक्षक पंकज गिर, पेठवडगाव बाजार समिती सभापती सुरेशराव पाटील, राजसिंह पाटील, यश पाटील, रुषीकेश सरनोबत, बाळासाहेब पाटील, बाबासो शिंदे, भगवान विभुते, धोंडीराम पुजारी, कृष्णात करपे, पांडूरंग तावडे, डॉ. सुभाष पाटील, विजय जाधव, संजय पाटील, सागर मोरे, योगेश खवरे, शिवाजी उनाळे, सायबाना रोहीदास, बापू पुजारी, दिलीप पुजारी, दिपक यादव, महादेव सुतार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरोली येथे पोलीस पाटील घराण्याच्या वतीने सीमोल्लंघन संपन्न
|