बातम्या

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवरील संशयातून तिची केली हत्या : हसत-हसत कॅमेऱ्यासमोर गुन्ह्याची कबुली

Boyfriend murders girlfriend on suspicion of her


By nisha patil - 6/14/2024 8:07:40 PM
Share This News:



प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन हसत-हसत गुन्ह्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझीयाबादमधील खुर्जाच्या मोहल्ला खीरखानी येथील कब्रस्तानमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणात महिला असमा प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.मृत महिलेचा प्रियकर अदनान याने कॅमेऱ्यासमोर खुनाची उघडपणे कबुली दिली ​​आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी अदमानने कॅमेऱ्यासमोर हसत-हसत गुन्ह्याची कबूली देताना म्हटलं आहे की, प्रेमात फसवणूक करण्याची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यू आणि म्हणून असमाला मारलं. इतकंच नाही तर संजय दत्तच्या ‘खलनायक’ या चित्रपटातील बल्लू बलराम या व्यक्तिरेखेने प्रभावित असल्याचंही आरोपीनं सांगितलं आहे. त्याला ना पोलिसांच्या कारवाईची भीती आहे ना असमाला मारल्याचा पश्चाताप, हे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे.


बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवरील संशयातून तिची केली हत्या : हसत-हसत कॅमेऱ्यासमोर गुन्ह्याची कबुली