बातम्या

"महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा : डॉ नीलम गोऱ्हे

Break the chain of those who cheat women Dr Neelam Gorhe


By nisha patil - 6/1/2025 10:26:14 PM
Share This News:



कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचारा संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केलेल्या कार्यवाही व उपाययोजना संदर्भात आज कोल्हापुरात आय जी ऑफिस मध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी बैठक घेतली. महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा तसेच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात केलेल्या कार्यवाही, सदर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाय योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत, जेष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर आज कोल्हापूरात विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात बैठक घेण्यात आली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महीलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना त्यावेळी  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या. 

यावेळी आ. राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शौमिका महाडिक प्रत्यक्ष सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ऑनलाईन उपस्थित होते. बैठकीला महिला कक्षामध्ये कार्यरत असणारे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


"महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा : डॉ नीलम गोऱ्हे
Total Views: 44