बातम्या
शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा निर्घृण खून
By nisha patil - 12/30/2023 4:26:30 PM
Share This News:
शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा निर्घृण खून
शरीरसंबंधास विरोध केल्याने नराधमाने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवणमध्ये घड ली. आशाताई मारुती खुळे असे या दुर्दैवी महिलेचं नाव असून पुरावा नष्ट करण्यासाठी ऊसाच्या फडाला आग लावण्यात आली. नराधम आरोपी गावामधील असून योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेशने ऊसाच्या फडात फरफटत नेत गळा दाबून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी फडाला आग लावली.
योगेश हा गावात ट्रक्टर चालक आहे. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. मयत आशाताई आईसह माहेरी भादवणला राहत होत्या. एका गरीब महिलेचा खून झाल्याबद्दल गावात संताप व्यक्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशाताई गुरुवारी दुपारी घरातील कचरा टाकण्यासाठी भादवण-भादवणवाडी रस्त्यावर असलेल्या ओढ्याकडे गेल्या होत्या. नराधम योगेश पाटील त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याने त्या येताच योगेशने त्यांना ऊसात फडात ३० फूट अंतरावर फरफटत नेले. ऊसात नेल्यानंतर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आशाताई यांनी आरडओरडा केला. यावेळी योगेशने त्यांचे तोंड दाबून साडीने गळा आवळून खून केला.
खून करून पळून गेला
आशाताईंचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने ऊसाच्या फडातून पळ काढून घरात निघून गेला. त्यानंतर पुन्हा तो त्या परिसरात ये जा करत होता. यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सायंकाळी उसाच्या फडाला आग लावून दिली आणि पुन्हा घरात येऊन थांबला. ऊसाची आग गावकऱ्यांनी आटोक्यात आणल्यानंतर अर्धवट अवस्थेत जळालेला आशाताई यांचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.आगीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. यावेळी योगेश तेथून चार-पाच वेळा फेऱ्या मारताना कैद झाला होता. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर खून केल्याची कबुली दिली.
शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा निर्घृण खून
|