राजकीय
अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार- उद्धव ठाकरे
By neeta - 1/2/2024 2:48:44 PM
Share This News:
रायगड : "शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. पेण येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मी मागच्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो. आतां म्हटलं तुम्हाला भेटूया. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. याची सुरुवात पेणपासून झाली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. निर्मला सीतारामन यांनी जड अंत करनाने हा अर्थसंकल्प मांडल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं त्या म्हणाल्या हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन. तुमच्या मित्रापलीकडे देश आहे हे आता १० वर्षानंतर त्यांना कळले. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानू कडे जा? सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत सांगा, असे त्यांनी म्हटले.
हे सगळे जादूचे प्रयोग सुरु
तुम्ही शेतकऱ्यांना आतेरेकी समजत होतात आता त्यांच्या बदल बोलताय. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहे. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग १० वर्ष काय केलं? आता खड्डा खाणायचा आहे, मग मतांची माती टाकायची आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन या १० वर्षातील सरकारचा कामाचा आढावा घ्या, अर्थसंकल्पामध्ये जे मांडला गेलं त्यात किती मिळाले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार- उद्धव ठाकरे
|