बातम्या

विश्वेश्वरय्यांच्या नावावर कलादालन कोल्हापुरात उभे करा

Build an art gallery in Kolhapur in the name of Visvesvaraya


By neeta - 1/30/2024 4:59:45 PM
Share This News:



कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ यांच्याकडे ताब्यात असलेला काळा नाका रेस्ट हाऊस परिसर 2012 साली हेरिटेज म्हणून ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे ही  जागा हेरिटेज म्हणून आहे त्याचे वास्तव्य तसेच राहू दे, तसेच विश्वेश्वरय्या यांच्या नावावर कला धरण कोल्हापुरात उभे राहावे अशी मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना आज देण्यात आले.
    कोल्हापूर कावळा नाका येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सि. स. नं 201 या जागेवर महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसुचना महाराष्ट्र शासन  राज्यपत्रामध्ये कोल्हापूर शहरातील हेरीटेज स्थळांची यादी प्रसिध्द केली आहे. यामध्ये शासकीय इमारतींची नांवे ग्रेड 2 मध्ये 4 नंबरला शासकीय रेस्ट हाऊस हा पूर्ण परिसर हेरिटेज म्हणून आहे. हा परिसर हेरिटेज मध्ये समाविष्ट करण्यामागे सिव्हिल इंजिनिअर  विश्वेश्वरय्या हे प्रमुख कारण आहे.            
    भारताचे प्रख्यात सिव्हिल इंजिनिअर विश्वेश्वरय्या हे राधानगरी धरणाचे काम सुरू असतानां श्रीमंत शाहू  महाराज यांच्या निमंत्रणावरून वेळोवेळी कोल्हापूरला आले होते, त्यावेळी  विश्वेश्वरय्या  यांचे वास्तव्य ट्रॅव्हल्स बंगला येथे म्हणजे आत्ताचे कावळा नाका रेस्ट हाऊस आहे, म्हणून सदरचा संपूर्ण परिसर हा हेरिटेज यादी मध्ये समाविष्ट आहे. 
महापालिकेच्या दुसरा विकास आराखडा मध्ये  सदर जागेचा वापर बदलायचा असल्यास महाराष्ट्र प्रादेषिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये कार्यवाही करून मगच हा वापर बदलला जाऊ शकतो असा नियम असताना महाराष्ट्र शासनाने  17 जानेवारी 2024 रोजी  अप्पर सचिव यांनी  कायदा  नुसार कार्यवाही न करता सध्या या जागेला विकासासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे.
    त्यामुळे हे शिवसेना ठाकरे गटाला मान्य नसून,ही जागा  कोणत्याही विकासकाला देऊ नये  तसेच या जागेवर  विश्वेश्वरय्या  त्यांच्या नावाने कलादालन उभा व्हावे   अशी मागणी  शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आज महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना करण्यात आली  याबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना  ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा कडक इशारा यावेळी प्रशासनाला  देण्यात आला.


विश्वेश्वरय्यांच्या नावावर कलादालन कोल्हापुरात उभे करा