बातम्या
बिल्डर्स असोशिएशन ऑफइंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे संपन्न -उद्योगपती नितीन धुत
By nisha patil - 10/18/2024 4:43:53 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) इचलकरंजी -बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये विविध विषयांवर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काँक्रीट, दगडी बांधकाम, बांधकाम आणि संबंधित उपकरणांशी संबंधित उत्पादने आणि तंत्रज्ञानाची विस्तृत श्रेणी असलेले ’वर्ल्ड ऑफ काँक्रिट इंडिया 2024’ राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनास बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या पदाधिकार्यांनी भेट देत अत्याधुनिक मशिनरी, केमिकल, उत्पादन आदींची माहिती जाणून घेतली. 200 हून अधिक जागतिक प्रदर्शकांचा सहभाग, नवीनतम उत्पादने, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे प्रदर्शन होते.
यावेळी बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के. विश्वनाथन यांनी, देशभरात बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियांची 22 शहरात स्व मालकीचे कार्यालय आहेत. त्यामध्ये इचलकरंजी सेंटरचाही समावेश असून बांधकाम क्षेत्रातील सर्वच संघटनांचे एकत्रित कार्यालय हे केवळ इचलकरंजी शहरात असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच तुम्हा सर्वांच्या सक्रिय भूमिकेमुळे बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाला सर्व कंत्राटदार, इन्फ्रा आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांचे खरे प्रतिनिधी म्हणून चांगली ओळख, नाव आणि प्रसिद्धी मिळेल, असेही सांगितले.
याप्रसंगी बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इचलकरंजीचे चेअरमन नितीन धुत यांच्या हस्ते बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के. विश्वनाथन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष भगवान देवकर, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता, मुंबई केंद्र अध्यक्ष जयप्रकाश भाटीया, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे सेक्रेटरी राजेंद्र शिंत्रे, ट्रेझरर पुंडलिक जाधव, मोहन सातपुते, प्रताप साळुंखे, आप्पा घुणके, राजेंद्र शिंत्रे, स्वप्निल पाटील, इब्राहिम काझी, सचिन जाधव आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
बिल्डर्स असोशिएशन ऑफइंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे संपन्न -उद्योगपती नितीन धुत
|