बातम्या

अजितदादांसमोर भाजप आमदाराची दादागिरी, थेट पोलीस कर्मचाऱ्याच लगावली कानाखाली..!

Bullying of the BJP MLA in front of Ajit Dada directly brought the policeman under his ear


By neeta - 5/1/2024 4:18:38 PM
Share This News:



पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आहे. भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सरकारमध्ये आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार याच्या दादागिरीचे किस्से अधूनमधून समोर येत असतात. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. . 
    पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देखील लगावल्याचा प्रकार घडला. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. कार्यक्रम संपल्यावर भाजप आमदारानं एकाच्या कानशिलात लागवल्याची गंभीर दाखल अजित पवार यांनी घेतल्याची माहितीही मिळत आहे.


अजितदादांसमोर भाजप आमदाराची दादागिरी, थेट पोलीस कर्मचाऱ्याच लगावली कानाखाली..!