बातम्या

शिवाजी पेठत भर दिवसा घरफोडी ; दहा तोळे सोने लंपास

Burglary in broad daylight in Shivaji Peth


By nisha patil - 5/1/2024 6:07:22 PM
Share This News:



शिवाजी पेठत भर दिवसा घरफोडी ; दहा तोळे सोने लंपास

कोल्हापूर: शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत काल  भर दुपारी एकच्या दरम्यान घर फोडी झाली. चोरट्याने तिजोरीतील दहा तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा सुमारे सहा लाख 11 हजारांचा मुद्देमाल पळवला आहे. याबाबतची फिर्याद आशुतोष तानाजी साळुंखे यांनी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.
 

 पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. दाट लोकवस्तीमध्ये असा प्रकार घडल्याने परिसरात एकच चर्चा झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशुतोष घरचा दरवाजा लावून जेवणासाठी शेजारील खोलीत गेले होते. यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला.  तिजोरी उघडून त्यातील दहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरला. दागिन्यांमध्ये गंठण बांगड्या कर्णफुले तसेच रोख दोन हजार रुपये चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरीचा प्रकार घडला तेव्हा काही भिकारी महिला चोरी झालेला घराच्या बाजूने पळत जाताना सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मध्ये दिसत आहेत. याच महिला पाणी मागण्यासाठी बाजूच्या घरातरद गेल्याचे प्रत्यदर्शनीनी सांगितले. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत


शिवाजी पेठत भर दिवसा घरफोडी ; दहा तोळे सोने लंपास