बातम्या

पोट भरले म्हणून ढेकर येतो, हा गैरसमज ; खरे कारण जाणून घ्या

Burping occurs because the stomach is full


By nisha patil - 2/23/2024 8:48:56 AM
Share This News:



अन्नपदार्थांचा अस्वाद घेतल्यानंतर पोट भरते आणि तृप्तीचा ढेकर येतो, असे म्हटले जाते. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. ढेकर येण्यामागे वेगळेच कारण असून त्याचा आणि पोट भरण्याचा काहीएक संबंध नाही. ढेकर येण्याचे खरे कारण जाणून घेऊयात.

असा येतो ढेकर
१. पोटात अन्न गेल्यानंतर पोटात जमा झालेला गॅस आवाजासह तोंड व गळ्याद्वारे बाहेर निघण्याच्या क्रियेला ढेकर येणे म्हणतात.
२. अन्न पोटात गेल्यानंतर अन्ननलिका व पोटाच्या मध्ये असलेले डायफ्रॅम आपोआप बंद होते.
३. याचवेळी पोटात गेलेल्या अन्नामुळे गॅस तयार होतो. अशावेळी मेंदूने हा गॅस बाहेर काढण्याची आज्ञा दिल्यानंतर काही स्नायू कडक होऊन डायफ्रॅम उघडते.
४. उघडलेल्या डायफ्रॅममधून गळा व तोंडाद्वारे गॅस बाहेर निघतो. म्हणून हा पोट भरल्याचा इशारा नाही.

असा येतो आवाज
गॅस अन्ननलिकेतून बाहेर पडत असताना काही कंपने तयार होतात, यामुळे गॅस बाहेर निघताना आवाज येतो.ढेकर येणे आवश्यक
ढेकर न आल्यास पोटदुखीची समस्या होऊ शकते. तसेच भूकसुद्धा मंदावू शकते.


पोट भरले म्हणून ढेकर येतो, हा गैरसमज ; खरे कारण जाणून घ्या