बातम्या
हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार
By nisha patil - 10/3/2025 2:12:24 PM
Share This News:
हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार
मत्स्य उद्योग व बंदरी विकास मंत्री नितीश राणे यांनी मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मास खरेदी करू नका असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. मल्हार सर्टिफिकेशन च्या माध्यमातून आपल्याला हक्काची मटन दुकान उपलब्ध होतील व शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशन चा जास्तीत जास्त वापर करावा आणि जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असे आवाहन नितेश राणे यांनी केला आहे.
मंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलंय की, आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार
|