बातम्या

डी वाय पाटील फोटोग्राफी क्लबने उलगडले खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य

By DY Patil Photography Club The beauty of Khidrapur temple unfolded


By nisha patil - 4/9/2023 5:27:14 PM
Share This News:



डी वाय पाटील फोटोग्राफी क्लबने उलगडले खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य

डी वाय पाटील फोटोग्राफी क्लबने उलगडले खिद्रापूर मंदिराचे सौंदर्यडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथील विद्यार्थ्यांच्या ‘पिक्सेलंस’ फोटोग्राफी क्लबच्यावतीने नुकतीच  खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी या मंदिराच्या विविध छायाचित्रांच्या माध्यमातून मंदिराचे प्राचीन वास्तू सौंदर्य उलगडले.

‘पिक्सेलंस’ क्लबच्या 73 सदस्यानी नुकतीच खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराला  भेट दिली. हे मंदिर म्हणजे प्राचीन स्थापत्य कला तसेच वास्तुकला आणि वास्तुशास्त्र यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे. या मंदिराचा स्वर्ग मंडप तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.  क्लबच्या सदस्यानी मंदिराच्या विविध भागांची  छायाचित्रे घेतली. ही छायाचित्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रसारित करून मंदिराचे न उघडलेले सौंदर्य पैलू या विद्यार्थ्यानी समोर आणले आहेत. 

    फोटोग्राफी क्लबचे समन्वयक प्राध्यापक मकरंद काइंगडे व प्राध्यापक आर्कीटेक्ट मनजित जाधव आणि  मार्गदर्शक डॉ. राजेंद्र रायकर यांच्या नेतृत्वाखाली या क्लबच्या सदस्यांनी हा उपक्रम राबविला. स्थानिक मार्गदर्शकाच्या माध्यमातून मंदिराचा इतिहास व वास्तुविषयक महत्त्व या विद्यार्थ्यांनी जाणून घेऊन त्यानंतर त्याची विविध छायाचित्रे काढली. या उपक्रमात डॉ. प्रतीक गायकवाड, विद्यार्थी समन्वयक तेजसिंह, प्रज्ञेश, आर्य, सन्मेश, प्रणव  व  सहकाऱ्यानी या उपक्रमात सहभाग घेतला.

    डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.


डी वाय पाटील फोटोग्राफी क्लबने उलगडले खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य