बातम्या
मैत्री फौंडेशनतर्फे कन्या महाविद्यालयास ग्रीन बोर्ड वितरण
By nisha patil - 6/17/2023 9:43:44 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी येथील मैञी फौंडेशनतर्फे श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयास ग्रीन बोर्ड वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मारवाडी युवा मंच मिड टाउन परिवाराच्या सर्व माजी अध्यक्ष, मैत्री फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कन्या महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन मैत्री फौंडेशनने महाविद्यालयाला दहा ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले. या ग्रीन बोर्डचा वापर विद्यार्थिनींना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल. तसेच पाच पंखे आणि दहा ट्युबलाईट भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमासाठी मैत्री फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांनी खूप मेहनत घेतली. मारवाडी युवा मंच मिडटाऊनच्या विद्यमान अध्यक्षा सुनीला जोशी , संगीता मुंदडा, विभा पाटणी,रेखा सारडा, रेणू झंवर, कविता डाळ्या, सुरेखा माळी तसेच उर्जा फौंडेशनच्या अध्यक्ष उर्मिला गायकवाड,उपाध्यक्षा सुचिता दिवाणी, यांच्या हस्ते ग्रीन बोर्ड वितरण करण्यात आले. येणाऱ्या काळात महाविद्यालयासाठी निश्चितच भरघोस मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. मैत्री फौंडेशनचे चंद्रप्रकाश छाजेड, मैत्री फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष वहिदा नेजकर, उज्वल चर्हाटे,अंजली शर्मा,अनिल कुंभार, संगीता पाटील, इंदिरा माहेश्वरी, कपिल बगाडिया, इमरान नेजकर, प्रफुल्ल घाडगे, जयकुमार बलवान आणि प्रा. डॉ. त्रिशला कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ताराराणी पक्षाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा उर्मिला गायकवाड आणि मारवाडी युवा मंचच्या माजी अध्यक्षा विभा पाटणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन याप्रसंगी मान्यवरांनी दिले. महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ.त्रिशला कदम मॅडम यांनी ग्रीन बोर्ड भेट दिल्याबद्दल मैत्री फौंडेशनचे आभार मानले आणि भविष्यात ही अशीच मदत मिळत जाईल , अशी अशा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संगीता पाटील यांनी केले .तर सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा पैलवान यांनी केले, आभार डॉ.धीरज शिंदे यांनी मानले.
मैत्री फौंडेशनतर्फे कन्या महाविद्यालयास ग्रीन बोर्ड वितरण
|