बातम्या
डीकेटीईच्या मानस गिडवाणीची मायक्रोचॅनेल कंपनीत निवड
By nisha patil - 7/17/2023 6:23:27 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील कॉम्प्युटर विभागातील मानस गिडवाणी या विद्यार्थ्यास मायक्रोचॅनेल, ऑस्ट्रेलिया या मल्टिनॅशनल कंपनी कडून एमएलएम इन्फोटेकच्या माध्यमातून सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून त्याला वार्षिक ४५ लाखांचे सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. डीकेटीईमध्ये नोकरीच्या संधीबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी इनोवेशन व इन्क्युबीएशन सेलकडून मार्गदर्शन केले जाते. याचाच लाभ घेत मानस याने स्वत:ची सॉफटवेअर कंपनी स्थापन केली असून एमएलएम इंन्फोटेकच्या माध्यमातून त्याला ४५ लाखाचे पॅकेज मिळाले. मायक्रोचॅनेल एंड-टू-एंड बिझनेस सिस्टम पूर्ण करण्यासाठी संगणक प्रणाली तयार करते. ते सीआरएम, इआरपी, रिटेल सिस्टीम आणि बी१ सारख्या संस्थात्मक गरजांसाठी पूर्ण सोलूशन देतात. मायक्रोचॅनेल एकबहुपुरस्कार विजेता बिझनेस सोलूशन आणि तंत्रज्ञान प्रणाली तयार करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. मायक्रोचॅनेलची कार्यालये सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन, पर्थ, ऑकलँड आणि सिंगापूर येथे आहेत आणि मायक्रोसॉफट, सॅप, सेज, मायओबी, क्वील्क आणि कॉरर्बरकडून ८० हून अधिक पुरस्कार प्राप्त करणारे आहेत.
मानस गिडवाणी याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ४५ लाखांवर झालेली निवड म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणा-या अघाडीच्या संस्थाबरोबर डीकेटीई भारतामधील सर्वोत्तम संस्था म्हणून गणली जात आहे ,याचा इचलकरंजी व डीकेटीईन्सना अभिमान आहे , अशी प्रतिक्रीया संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केली. मानसच्या या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,व्हाईस चेअरमन व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ डी.व्ही. कोदवडे, टीपीओ प्रा. जी.एस.जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डीकेटीईच्या मानस गिडवाणीची मायक्रोचॅनेल कंपनीत निवड
|