बातम्या

महामानवाला ज्ञानवंदना १पेन, १ वही, १ पुस्तक अर्पण करून

By offering Gnanavandana 1 pen 1 notebook 1 book to Mahamanava


By nisha patil - 6/12/2023 4:28:46 PM
Share This News:



महामानवाला ज्ञानवंदना  १पेन, १ वही, १ पुस्तक अर्पण करून 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 कोल्हापूरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी कोल्हापूच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला ज्ञानवंदना  १पेन, १ वही, १ पुस्तक अर्पण करून करण्याचा उपक्रम राबवला जातो हा उपक्रम गेली ७ वर्षे लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने राबवण्यात येतो . 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणारे अभिवादक पेन ,पुस्तक ,वही अर्पण करतात. यातून  जमलेले पुस्तक, पेन, वही याचे वाटप अति दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना केले जाते . या सामाजिक उपक्रमासाठी  कोल्हापूरकर भरभरून प्रतिसाद देतात राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील लोक भेट देऊन ज्ञानवंदना करतात 


महामानवाला ज्ञानवंदना १पेन, १ वही, १ पुस्तक अर्पण करून