विशेष बातम्या

जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहतुकदारांनी स्पेशल लायसन्स प्राप्त करुन घ्यावे

By transporters transporting animals Get a special license


By nisha patil - 6/20/2023 5:30:57 PM
Share This News:



कोल्हापूर, प्रतिनिधी  बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहतुकदारांनी जनावरांची वाहतुक करण्यापूर्वी आपल्या वाहनांमध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 125 ई च्या तरतुदी नुसार वाहनांच्या बांधणीमध्ये सयोग्य बदल करुन आपल्या वाहनांच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन स्पेशल लायसन्स (Special License) प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.

द प्रिवेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनीमल्स (ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनीमल्स ऑन फूट) कायदा, 2001 (The Prevention of Cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules, 2001)  च्या नियम 96 च्या तरतुदीनुसार वाहनांमधून जनावरांची वाहतुक करतांना वाहतुकदाराने सक्षम प्राधिकरण तथा ॲनीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी तसेच केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी या व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांची वाहतुक करण्यास वाहतुकदारांनी नकार देणे अपेक्षित आहे. 

तसेच द प्रिवेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनीमल्स कायदा 1960. द ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनीमल्स कायदा 1978 व  द प्रिवेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनीमल्स (ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनीमल्स ऑन फूट) कायदा, 2001 (The Prevention of Cruelty to Animals Act. 1960 The Transport of Animals Rules 1978 व The Prevention of Cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules, 2001)  च्या कायदा व नियमांच्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतुक करु नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कायदे नियमातील तरतुदीनुसार संबधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहतुकदारांनी स्पेशल लायसन्स प्राप्त करुन घ्यावे