बातम्या
देभरातील सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर...
By nisha patil - 12/13/2023 3:45:12 PM
Share This News:
देभरातील सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विद्यार्थ्यांनाही आता आपल्या अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे. दोन महिन्यानंतर या परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना बराच वेळ मिळाला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबईएसई)च्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने डेट शीट जारी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. ही परीक्षा 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. बोर्डाने अखेर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तारखा पाहून विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना cbse.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच वेळापत्रक डाऊनलोडही करता येणार आहे. सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठी 1 जानेवारी 2024 पासून प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे
2024मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यी सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षेची पूर्ण तयारी केली आहे. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनाही आपल्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी वाव मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी आजपासूनच हे नियोजन सुरू केलं आहे.
देभरातील सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर...
|