बातम्या

सीईओ कार्तिकेयन एस. यांनी जिल्हापरिषदेतील बैठकीत विभागांचा घेतला आढावा

CEO Karthikeyan S He reviewed the departments in the Zilla Parishad meeting


By nisha patil - 9/1/2025 1:48:54 PM
Share This News:



जिल्हा नियोजन मंडळ  आणि १५ वित्त आयोग व आर्थिक नियोजनातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जी विकासकामे केली आहेत, त्यांची बिल घेऊन ५ मार्च पूर्वी बिले अदा करा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. सीईओ कार्तिकेयन एस. यांनी जिल्हापरिषदेतील बैठकीत विभागांचा आढावा घेत तसेच प्रलंबित विकासकामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना देखील दिल्या.
  
 जिल्हा नियोजन मंडळ  आणि १५ वित्त आयोग व आर्थिक नियोजनातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जी विकासकामे केली आहेत, त्यांची बिल घेऊन ५ मार्च पूर्वी बिले अदा करा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. सीईओ कार्तिकेयन एस. यांनी जिल्हापरिषदेतील बैठकीत विभागांचा आढावा घेतला तसेच प्रलंबित विकासकामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना देखील दिल्यात. यामध्ये विशेषतः २०२३-२४ आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन विभागाकडील ३० व ५४ आणि ५०-५४ या लेखाशीर्षातून जी विकासकामे पूर्ण झालीयेत. त्यांच्या बिल मागणीचे प्रस्ताव संबंधित ठेकेदारांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत जमा करून घ्यावेत. ५ मार्चपर्यंत बिलाची रक्कम अदा करावी, अशा सूचना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांना दिल्या. मार्च महिन्यात शेवटच्या काही दिवसांत बिल मंजुरीसाठी होणारा गोंधळ टाळण्यासाठी सीईओंनी विकासकामांचा आढावा घेत सूचना दिल्या.


सीईओ कार्तिकेयन एस. यांनी जिल्हापरिषदेतील बैठकीत विभागांचा घेतला आढावा
Total Views: 75