बातम्या

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण पात्र महिला वंचित राहू नयेत - जिल्हाधिकारी

CM My dear sister deserving women should not be deprived Collector


By nisha patil - 11/7/2024 3:08:07 PM
Share This News:



 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरुपात आत्तापर्यंत 29547 व ऑफलाइन 88470 महिलांनी सहभाग घेतलाय.शासनाची ही योजना महत्त्वकांक्षी असून गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना माहिती देवून जास्तीत जास्त महिलांची ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच कोणीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण जिल्हास्तरीय समिती अमोल येडगे यांनी सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला दिल्या. या योजनेबाबतची आढावा बैठक बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकी करिता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मूतकेकर, उपायुक्त पंडित पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी निपसे राहूल, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईनगडे, जिल्हास्तरीय संबंधित विभाग प्रमुख तर ऑनलाईन स्वरूपात सर्व तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, महिला बालविकास  अधिकारी, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रमुख तहसिल कार्यालयातून व्हीसी द्वारे उपस्थित होते.

    बैठकीवेळी गाव निहाय माहिती सादर करण्यात आली. सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेली गावे, सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेली गावे, शहर भागात सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेले वार्ड व सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेले वार्ड याप्रमाणे तपशील सादर करण्यात आला.


मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण पात्र महिला वंचित राहू नयेत - जिल्हाधिकारी