बातम्या
संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक
By nisha patil - 9/16/2023 7:44:39 PM
Share This News:
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक होणार असून मराठवाड्यासाठी आज राज्य सरकारकडून ४० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार , मराठवाड्यातील दळणवळण, सिंचन तसेच कृषी, वैद्यकीय महाविद्यालय, रिंग रोड बनविण्यासह जलसंपदा विभागात १,३११ कोटी खर्चातून सहा नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव या बैठकी समोर मांडले जाणार आहेत तसेच दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील बळीराजासाठी ही विशेष पॅकेज जाहीर केले जाणार आहेत ,
गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील दाट वाढलं आहे . हीच बाब लक्षात घेता, राज्य सरकारकडून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील २९ मंत्री हजर राहणार आहेत .
संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक
|