बातम्या
कळंबा कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच सापडला गांजा : सुमारे अडीच किलो गांजासह 73 हजारांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 7/29/2023 5:26:39 PM
Share This News:
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुभेदाराकडेच सुमारे अडीच किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळंबा कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अमली पदार्थ सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहामध्ये मोबाईल सिम कार्ड आणि गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून येत होते मात्र आज कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अमली पदार्थ मिळून आलाय त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे . 55 वर्ष बाळासाहेब भाऊ गेंड असे या सुभेदाराचं नाव असून जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलय. याबाबतची फिर्याद कारागृहाचे शिपाई महेश दिलीप देवकाते यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. आज सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झडती घेत असताना सुभेदार यांच्याकडे 1710 रुपये किमतीचा 171 ग्राम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. हा गांजा प्लास्टिक पिशवी आणि त्यावर खाकी टेप लावून पॅकिंग मध्ये होता पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर संशयीत गेंड याच्या कळंबा येथील घराची झडती घेतली असता या घरात 23 हजार 250 रुपये किमतीचा दोन किलो 325 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ आणि पन्नास हजार पाचशे रुपयांची रोकड असा एकूण 73 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे कळंबा कारागृहात प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे यापूर्वी कैद्यांकडे गांजा आणि मोबाईल सापडत होता मात्र आता कारागृहाच्या सुभेदाराकडेच अमली पदार्थ मिळून आल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होतोय.
कळंबा कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच सापडला गांजा : सुमारे अडीच किलो गांजासह 73 हजारांचा मुद्देमाल जप्त
|