बातम्या
केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाची दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा : जिल्हाधिकारी येडगे
By nisha patil - 8/1/2025 6:29:38 PM
Share This News:
केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाची दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा : जिल्हाधिकारी येडगे
के. मंजुलक्ष्मी यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे आजवर झालेल्या कामाचा घेतला आढावा.
जिल्हाधिकारी येडगे व प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत बैठक
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आजवर झालेल्या कामाचाही आढावा बैठकीत घेतला. पहिल्या टप्प्यातील काम गतीने सुरू असून आता छत बसविण्याचे काम सुरू असल्याचे माहिती बैठकीत देण्यात आलीय.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आजवर झालेल्या कामाचाही आढावा बैठकीत घेतला. पहिल्या टप्प्यातील काम गतीने सुरू असून आता छत बसविण्याचे काम सुरू असल्याचे माहिती बैठकीत देण्यात आलीय. त्यानंतर या नाट्यगृहाची उभारणी जशीच्या तशी करावी, अशी नाट्यरसिकांची मागणी होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये वाहनतळ, कलादालन, लिव्हिंग रूमच्या कामाचा समावेश आहे. या दुसऱ्या टप्प्यातील कामाला हेरिटेज कमिटीकडूनही नुकतीच मंजुरी देण्यात आलीय. दुसऱ्या टप्प्यातील कामे देखील तत्काळ सुरु व्हावीत, यासाठी या कामाची निविदा प्रसिध्द करुन ठेका देण्याची प्रक्रिया सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्यानंतर तत्काळ निविदा प्रसिध्द करा, असे जिल्हाधिकारी येडगे व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगीतले. या बैठकीला नगरचना विभागाचे सहा. संचालक विनय झगडे, शहर अभिंयता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियता एन.एस.पाटील, अभियता अरुणकुमार गवळी, आदी उपस्थित होते.
केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाची दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा : जिल्हाधिकारी येडगे
|