बातम्या

प्रतिज्ञा उत्तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचकडून शिबिर

Camp by Shambhu Raje Mardani Khel Vikas Manch on the occasion of Pratighya Uthwes birthday


By nisha patil - 5/31/2023 5:18:30 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच आयोजित स्वयंरक्षण  शिबिर आयोजन करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसापासून राजारामपुरी नऊ  नंबर शाळेच्या ग्राउंडवर या प्रशिक्षणाचे धडे मुलांना देण्यात आले. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरणाचा समारंभ आणि प्रतिज्ञा उत्तरे यांचा वाढदिवस कार्यक्रम राजारामपुरीतील सूर्या हॉल येथे मोठ्या उत्साह संपन्न झाला. शिवसेनेचे संपर्क नेते माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख कोल्हापूर  अरुण भाई दुधवडकर यांच्या उपस्थित उत्कृष्ट कलाकार विद्यार्थी म्हणून  तनवी पाटील हिला प्रथम, साईशा पाटील द्वितीय, सुदांश देवकर याला तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह तसेच हातातला कंडा भेट देऊन सन्मानित करण्यात आल. या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी श्रीफळ शाल देऊन मान्यवर नेत्यांचे स्वागत केले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिवाकर रावते यांनी प्रतिज्ञा उत्तुरे यांना शुभेच्छा दिल्या तर विनायक राऊत यांनी देखील भविष्यकाळातहि  अशीच सामाजिक काम करत म्हणत प्रतिज्ञा उत्तूरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे शहर प्रमुख रविकिरण इंगवले सुनील मोदी मंजीत माने हर्षल सर्वे विशाल देवकुळे स्मिता सावंत प्रीती क्षीरसागर जयश्रीताई बालीकर श्रद्धा जाधव शुभांगी पवार कमलाकर जगदाळे  रघुनाथ टिपुगडे प्रतिज्ञा महेश उत्तरे वाढदिवस गौरव समितीचे कार्यकर्ते , शिबिरार्थी विद्यार्थी पालक आणि राजारामपुरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिज्ञा उत्तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचकडून शिबिर