बातम्या

हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना उमेदवारी

Candidate from Hatkanangale to Dharisheel Mane


By nisha patil - 3/28/2024 8:01:38 PM
Share This News:



हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना उमेदवारी

कोल्हापूर :प्रतिनिधी हातकणगले मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. याची पोहोचपावती म्हणून खास.धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे माने यांच्या कार्यकर्ते जोरदारपणे चार्ज झाले आहेत.
 

गेल्या १५ दिवसात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारी संदर्भात उलट सुलट चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या होत्या. धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार नाही तसेच ही जागा भाजपला जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती.त्यामुळे खासदार माने यांनी सातत्याने मुंबई दौरे करून उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती. अशातच काल मुंबई येथे मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खासदार माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या दारात हेमंत गोडसेंचं शक्तिप्रदर्शन; नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादंग
दरम्यान धैर्यशील माने यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळतात कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाबाहेर फटाके उडवत जल्लोष केला आहे. सध्यातरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रातील हे दोन्ही गड आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आला आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महायुती कशी ताकद लावेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे


हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना उमेदवारी