बातम्या

लिंगनुर कापशी येथे सकल मराठा समाजाचा "कँडल मार्च"

Candle March of Sakal Maratha Community at Linganur Kapshi


By nisha patil - 1/11/2023 11:26:29 PM
Share This News:



सध्या राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आणि आमरण उपोषणास बसलेल्या मा. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात लिंगनूर येथे भव्य कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे, मनोज जरांगे आप आगे बढो हम आपके साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.  यावेळी सकल मराठा समाजाकडून तमाम मराठा आंदोलकांना शांततेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे  पाटलांसारखा लढाऊ, निडर, समाजाशी एकनिष्ठ असणारा प्रामाणिक नेता मराठ्यांचे नेतृत्व करण्यासाठी कायम हवा आहे यासाठी समाज बांधवांकडून जरांगे पाटलांनी स्वतःची तब्येत सांभाळावी अशी विनंती केली. आरक्षणासाठी रस्त्यावरच्या आंदोलनात आम्ही शेवटपर्यंत जरांगेंच्या सोबत राहू असा निर्धार केला. 
                         

मराठा समाजातील तरुण सध्या बेरोजगारी मुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे बनलं आहे. या आंदोलनात अनेक तरुणांनी, समाज बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी थोडा धीर धरावा. आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. 
                         

यावेळी गावचे सरपंच स्वप्निल कांबळे, शिवाजी मेथे, विलास भोसले, नंदकुमार किल्लेदार, पो. पा. बापूसो पाटील, माजी सैनिक बाळकृष्ण कुऱ्हाडे, प्रा. डॉ. प्रवीण जाधव, संभाजी यादव, मयूर आवळेकर, प्रमोद कुराडे, संदेश जाधव, हरिदास पोवार, संदीप घाडगे


लिंगनुर कापशी येथे सकल मराठा समाजाचा "कँडल मार्च"