बातम्या

आजपासून कोल्हापुरात ऊसतोड बंद आंदोलन ; साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता

Cane cutting ban movement in Kolhapur from today

By nisha patil - 12/25/2023 7:08:04 PM
Share This News:

आजपासून कोल्हापुरात ऊसतोड बंद आंदोलन ; साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता

कोल्हापूर : ऊस तोडणी दरवाढी संदर्भात गेल्या दोन-तीन महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने महाराष्ट्र राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनांनी अखेर आज पासून कोणता बंद म्हणजेच ऊसतोड बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला आहे. यामुळे साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्षाची चिघळण्याची शक्यता आहे
ऊस तोडणी वाहतूक दर वाढ व कमिशन वाढ संदर्भात साखर कारखानदार प्रस्ताव मान्य करण्यास तयार नाहीत त्यामुळे तीन बैठका निष्फळ ठरल्या. इतक्या बैठकीनंतर ही आज अखेर राज्य साखर संघाने राज्य सरकारने पक्षीय बैठक बोलावली नाही. त्यामुळे सर्व संघटनांना नाईलाजाने कोयताबंद आंदोलन सुरू करावी लागत आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत साखर संघ व राज्य सरकार जबाबदार राहील असे महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर सुभाष जाधव यांनी सांगितले आहे.

आजपासून कोल्हापुरात ऊसतोड बंद आंदोलन ; साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता