बातम्या

रात्री झोप येत नाही का ? हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल

Cant sleep at night Follow this remedy


By nisha patil - 1/16/2024 7:20:12 AM
Share This News:



झोप न येण्याचे कारण व उपाय : रात्री झोप न येणे व करवट बदलणे ही समस्या सर्वांना येते. आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात झोप गायबच होऊन गेली आहे. तुम्हाला पण झोप येत नाही का तर दोन उपाय अवलंबवा. लगेच झोप येईल. आणि नियमित पणाने याचा सराव  केल्याने तुम्हाला हळू-हळू  झोप येईल. * झोप न येण्याचे सहा कारण - 
१. अनावश्यक चिंता करणे किंवा तणावात असणे .
२. नेहमी सतत काहीतरी विचार करणे .
३. शरीर थकत नसेल किंवा आरामदायी जगणे  
४. अनियमित जीवनशैली-रात्रीचे जेवण उशिरा करणे 
५. शारीरिक दुखणे-सर्वाइकलचा त्रास असणे इत्यादी 
 
* झोप येण्यासाठी उपाय :
१. फिरणे - सगळ्यात आधी जेवणात बदल करून उत्तम भोजन करणे. जेवण केल्यानंतर  रात्री फिरणे कमीत कमी 2500 स्टेप चाला. जर तुम्ही हे कार्य करू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी स्वत:ला सांगा की, काहीच विचार करायचा नाही. हा मंत्र म्हणत रहावे जोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही. २. योगनिद्रा मध्ये झोपणे - झोपण्यापूर्वी कमीतकमी पाच मिनिट प्राणायाम करणे. म्हणजे अनुलोम विलोम करणे. या नंतर शवासन मध्ये झोपा व पूर्ण शरीराला हलके सोडा. आता सगळ्यात आधी पायाच्या अंगठयावर लक्ष्य केंद्रित करा. मग गुडघ्यावर, मग नाभी वर, मग हृदयावर नंतर भुवळ्यांवर लक्ष्य केंद्रित करा. यानंतर यावरून लक्ष्य काढून धीरे धीरे श्वासावर लक्ष्य केंद्रित करून शांत झोपा.दररोज याचा नियमित सराव करावा.


रात्री झोप येत नाही का ? हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल