खेळ

कर्णधार केएल राहुल आयपीएलमधून बाहेर?   

Captain KL Rahul out of IPL


By surekha -
Share This News:



कर्णधार केएल राहुल आयपीएलमधून बाहेर?                                                                                                                                                             लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल  आयपीएलमधून  बाहेर पडणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. आयपीएल 2023 मध्ये आता लखनौ सुपर जायंट्सचा  कर्णधार केएल राहुल मैदानावर दिसण्याची शक्यता फार कमी आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. आता तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर जाणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे.
लखनौ सुपर जायंट्स संघाला आता केएल राहुलशिवाय उरलेले सामने खेळण्यासाठी तयार राहावं लागेल. लखनौ संघाचा कर्णधार सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राहुल लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात खेळणार नसल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. चेन्नई विरुद्धचा सामना तो खेळणार नसून फक्त बेंचवर बसून पाहणार आहे. त्यानंतर गुरुवारी राहुल मुंबईला रवाना होईल. तिथे त्याच्या दुखापतीसंदर्भातील इतर टेस्ट केल्या जाणार आहे.इकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान चेंडूच्या मागे धावताना राहुलच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानातून बाहेर पडला. त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट अधिकृतरित्या समोर आलेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुल यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.


Captain KL Rahul out of IPL