बातम्या

करुंगळे येथे कॅप्टन राजाराम ठाणू वारंग यांचा २९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीचा सत्कार

Captain Rajaram Thanu Warang felicitated on retirement after 29 years of service at Karungale


By nisha patil - 3/10/2024 5:07:09 PM
Share This News:



 करुंगळे (ता.शाहूवाडी) येथील कॅप्टन श्री.राजाराम ठाणू वारंग हे भारत मातेची २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... 

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष इनामदार,बाळासाहेब गद्रे,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत(आप्पा),करंगुळे गावचे सरपंच माधव कंळत्रे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एन.बी.पाटील,करंगुळे हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंदा वारंग,दिलीप वीर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,माजी सैनिक संघटना,वारंग कुटुंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते...


करुंगळे येथे कॅप्टन राजाराम ठाणू वारंग यांचा २९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीचा सत्कार