बातम्या

कोडोलीत मालवाहू ट्रक ओढयात कोसळला : दोघे जखमी

Cargo truck falls into stream in Kodoli


By nisha patil - 10/7/2023 12:32:05 PM
Share This News:



कुंभोज/ प्रतिनिधी विनोद शिंगे) बोरपाडळे वाठार राज्य  मार्गावर कोडोली ता.पन्हाळा येथील नरसोबा मंदिराला  जवळील ओढयावरील पुलावरून आज दि. ९ रोजी रविवारी पहाटे  चिऱ्याने भरलेला ट्रक ओढ्यात  कोसळला . या अपघाततात दोघेजण जखमी झाले. 
 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साखरपा येथून विजापूर कडे हा ट्रक जात होता. रविवारी पहाटे चालकाला  ओढयावरील  वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक पुलाचे सुरक्षा कठडे तोडून  ओढयात कोसळला. यावेळी ट्रक चालक इनामदार रहाणार (महमदपूर जि विजापूर ) व त्याच्या साथीदाराच्या डोक्यास व इतरत्र दुखापत झाली. त्यांच्यावर  येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सीपीआर  रुग्णालयात पाठविणेत आले.             रात्रीच्या वेळी नवीन वहान चालकास या वळणाचा अंदाज येत नसलेने ते धोकादायक आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात होत असतात.  हे वळण काढणेबाबत वहानधारकांच्याकडून सतत मागणी होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सातत्याने आपघात होतात अजून किती अपघात घडत राहणार अशी नागरीकांच्यातून चर्चा होत आहे.
 


कोडोलीत मालवाहू ट्रक ओढयात कोसळला : दोघे जखमी