खेळ
रोहित ॲण्ड कंपनीपुढे कॅरेबिअन आर्मीचे आव्हान
By Administrator - 8/14/2023 6:41:50 PM
Share This News:
रोहित ॲण्ड कंपनीपुढे कॅरेबिअन आर्मीचे आव्हान
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ करणार आहे. नव्या उमेदीने टीम इंडिया मैदानात उतरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि यंदा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता वेस्ट इंडिजविरोधात आपल्या पुढील अभियानाला टीम इंडिया सुरुवात करत आहे. यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेशकुमार यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीस भारताने सुरुवात केली आहे. नवे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे विश्वचषकातून गाशा गुंडाळल्यामुळे वेस्ट इंडिजवर टीकेची झोड उडाली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळत नाही, त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्यामुळे भारताविरोधात वेस्ट इंडिजचा संघ आक्रमकपणे उतरेल. क्रैग ब्रॅथवेटच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाला आव्हान देणार आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला पराभूत करणं, तितके सोपं नाही. कागदावर भारताचा संघ मजबूत वाटत असला तरी घरच्या खेळपट्टयावर विडिंजचा संघ विजय मिळवू शकतो.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत. 2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
शुभमन गिल, रविंद्र जाडेजा, विराट कोहली, क्रैग ब्रॅथवेट, चंद्रपॉल, केमर रोच या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष असेल. केमर रोच आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहण्यासारखा असेल. त्याशिवाय क्रैग ब्रॅथवेट आणि मोहम्मद सिराज यांचाही सामना रंजक असेल.
रोहित ॲण्ड कंपनीपुढे कॅरेबिअन आर्मीचे आव्हान
|