विशेष बातम्या

सिंधी समाजा विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल: जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत

Case filed against Sindhi communityJitendra Awad again in trouble


By nisha patil - 2/6/2023 8:58:09 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जितेंद्र आव्हांडांविरोधात सिंधी समाजानं एफआयआर  दाखल केला आहे. भारतीय सिंधी सभेकडून जिंतेंद्र आव्हाडां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. सिंधी समाजाच्या बदनामीप्रकरणी मुंबईच्या खार पोलीस स्थानकात, तसेच उल्हासनगरमध्येही  एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र सिंधी बांधवांमध्ये मॉर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांना जितेंद्र आव्हाडांविरोधात भडकवलं जात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात 27 मे रोजी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सिंधी समाजाविरोधात वक्तव्य करणं त्यांना भोवलं आहे. याप्रकरणी आमदार आव्हाड यांच्याविरोधात भारतीय सिंधी सभेनं मुंबईतील खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच, भारतीय जनता पार्टीचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष जमनादास खूबचंद पुरूसवाणी यांच्या तक्रारीवरून हिल लाईन पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उल्हासनगर येथे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष पंचम कालानी यांनी कार्यकत्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या आढावा बैठकीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सिंधी समाजाबाबत एक वक्तव्य केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे सिंधी धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, असा उल्लेख भाजप नेते जमनादास खूबचंद पुरूसवाणी यांनी तक्रारीत केला आहे. 

उल्हासनगर शहरातील सिंधी समाजाच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाडांचं आक्षेपार्ह्य वक्तव्याचा कथित व्हिडीओ सर्व सोशल मिडीया माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान, उल्हासनगर इथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला उद्देशून जे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य सिंधी समाजाचा अपमान करणारं असल्याचं सांगत यावर सिंधी समाजानं आक्षेप घेतला. तसेच, याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजानं कोपरी इथं एकत्र येत आव्हाडांचा निषेध नोंदवला. तसेच जोपर्यंत तो समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत विविध संविधानिक मार्गानं त्यांचा निषेध नोंदवला जाईल, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे.


सिंधी समाजा विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल: जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत