बातम्या

कोल्हापुरातील 300 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Case registered against 300 MNS workers in Kolhapur


By nisha patil - 1/29/2024 6:25:55 PM
Share This News:



 कोल्हापूर  - कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना विनापरवाना मोटरसायकल रॅली काढल्या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.नूतन जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काल  (रविवारी) मनसे पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ताराराणी चौक इथून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.या रॅलीत जवळपास 200 दुचाकी सहभागी झाल्या होत्या.मात्र कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू असताना बेकायदेशीररित्या जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी  गुन्हा दाखल केलाय.


कोल्हापुरातील 300 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल